Type Here to Get Search Results !

राहुरी - घरगुती कारणावरून बहिण भावाला शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण.


 


घरगुती कारणावरून बहिण भावाला शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण. 


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


घरगुती कारणावरून आरोपींनी दोघा बहिण भावाला शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी मारहाण करत लखंडी कत्ती मारुन जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. 


उज्वला गुलाब शिंदे, वय २२ वर्षे, धंदा मजुरी, रा. कात्रड, ता. राहुरी, या विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उज्वला शिंदे हिच्या घरातुन भांडे घेवुन जाण्याचे कारणावरुन सासु बरोबर वाद झाले होते. त्यावेळी तीचे दिर महेश शिंदे, सागर शिंदे यांनी उज्वला शिंदे हिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती.


रात्री ८ वाजे दरम्यान उज्वला शिंदे हिला वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असताना तीचा पती गुलाब शिंदे व भाऊ विशाल रावसाहेब बर्डे हे दोघे ग्रामीण रुग्णालया बाहेर उभा होते. तेव्हा तेथे आरोपी आले, त्यांनी विशाल बर्डे याला लाथा बुक्क्याने मारहाण करुन लोखंडी कत्तीने मारुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.


उज्वला गुलाब शिंदे हिच्या फिर्यादीवरून आरोपी महेश अशोक शिंदे, सागर शांताराम शिंदे, सिंधुबाई अशोक शिंदे, अशोक दशरथ शिंदे, गौरव अशोक शिंदे, इंदुबाई शांताराम शिंदे, सर्व रा. कात्रड, ता. राहुरी यांच्यावर गुन्हा रजि. नं. १४९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (२), १९०, १९१ (१), १९१ (३), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.