Type Here to Get Search Results !

राहुरी - राजेश पवार यांच्यावर कोणत्याने वार करून त्यांच्या पत्नीला काठीने मारहाण

 राजेश पवार यांच्यावर कोणत्याने वार करून त्यांच्या पत्नीला काठीने मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


छोट्या मुली घरासमोर सौचास बसल्याच्या कारणावरून आरीपीने राजेश पवार यांना शिवीगाळ करुन त्यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच त्यांच्या पत्नीला लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे दि. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. 


राजेश शंकर पवार, वय ३५ वर्षे, रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यात म्हटले आहे कि, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास राजेश पवार यांच्या छोट्या दोन मुली घरासमोर सौचास गेल्या होत्या.


तेथे आरोपी आला व म्हणाला कि मुली येथे सौचास का बसवल्या. असे म्हणुन त्याने शिवीगाळ केली व त्याचे घरातुन जावुन कोयता आणला. आणि राजेश पवार यांच्यावर वार करून जखमी केले. त्यावेळी राजेश यांची पत्नी पुजा ह्या सोडवण्यासाठी आल्या असता त्यांना ही आरोपीने लाकडी काठीने मारहाण केली.


राजेश शंकर पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन (पुर्ण नाव माहित नाही) रा. प्रसाद नगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. १७९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५२ गुन्हा दाखल करण्यात आला