मार्कस जाधव यांना शिवीगाळ व लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
शेळ्या शेतात आल्याचा जाब विचारला असता आरोपींनी मार्कस जाधव यांना शिवीगाळ करत लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच कोयता मारुन जखमी केले. ही घटना राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथे दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान घडली.
मार्कस विठ्ठल जाधव, वय ५८ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथे राहत असून त्यांच्या शेजारीच सुरेश जाधव हा त्याच्या कुटुंबासह राहवयास आहे. दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मार्कस जाधव हे त्यांच्या घरासमोर असताना सुरेश जाधव यांच्या शेळ्या मार्कस जाधव यांच्या शेतात आल्या.
तेव्हा मार्कस जाधव हे त्यांना समजावुन सांगण्यास गेले असता आरोपींनी त्यांना घाणघाण शिवागाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच कोयता मारुन जखमी केले. त्यानंतर तु पुन्हा जर आमच्या नादी लागला तर तुला जिवे ठार मारुन टाकु, अशी धमकी दिली.
मार्कस विठ्ठल जाधव यांच्या फिर्यादीवरून सुरेश रभाजी जाधव, रमेश रभाजी जाधव, विकास सुरेश जाधव, शांताबाई रभाजी जाधव, सर्व रा. पिंपळगाव फुणगी, ता. राहुरी, या चार जणांवर गुन्हा रजि. नं. १८०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३५१ (२), ३ (५), ११८ (१), ११५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
