Type Here to Get Search Results !

पारनेर - रवींद्रशेठ राजदेव यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध उपक्रमाचे आयोजन.









रवींद्रशेठ राजदेव यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध उपक्रमाचे आयोजन.


पारनेर /प्रतिनिधी


शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा नांदूर पठारचे माजी सरपंच रविंद्र राजाराम राजदेव यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत सकाळी ९ वाजता पार पडणार असून, निलेश लंके प्रतिष्ठान आणि रविंद्र राजदेव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. समाजातील गरजू घटकांना थेट लाभ देणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचा यात समावेश आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराने होईल. याच वेळी आरोग्य शिबिर, मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप, रेशनकार्ड वाटप, बांधकाम कामगार कार्ड वाटप तसेच बांधकाम कामगारांसाठी भांडी वाटप असे विविध शिबिरे भरविण्यात येणार आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासह आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

दुपारी १ वाजता स्वप्नवेध अनाथालय, मंगरूळ येथे विद्यार्थ्यांसाठी भोजन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर टाकळी ढोकेश्वर येथे अपंग आणि मुख-बधिर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येईल. संध्याकाळी ७ वाजता खेळ पैठणीचा कार्यक्रम राणीताई लंके यांच्या उपस्थितीत होईल.

तसेच या ठिकाणी गाडी घुंगराची फेम विलासराव अटक हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

 यानंतर अभिष्टचिंतन सोहळा आणि भोजन सभारंभाने कार्यक्रमाची सांगता होईल.

रविंद्र राजदेव हे पारनेर तालुक्यातील सामाजिक कार्यासाठी ओळखले जाणारे नेते असून, ते निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली ते नियमितपणे आरोग्य, शिक्षण आणि शासकीय योजनांशी संबंधित उपक्रम राबवितात. हा वाढदिवस सोहळा केवळ व्यक्तिगत साजरा नसून, समाजसेवेच्या माध्यमातून लोकाभिमुख कार्य करण्याचा संकल्प आहे.

या कार्यक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक गरजू व्यक्तींना या शिबिरांचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सर्वांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.