Type Here to Get Search Results !

राहुरी - सुनिता हारदे यांना सासु, नणंद व भाच्याकडून मारहाण

 सुनिता हारदे यांना सासु, नणंद व भाच्याकडून मारहाण.



पोलीस पाटील भांडण मिटून गेलेत, तु आता भांडण वाढू नको, असे म्हणाल्या राग आल्याने मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


गावचे पोलीस पाटील घरी घेवून भांडण मिटून गेले आहेत, तु आता भांडण वाढू नको, असे म्हणाल्या राग आल्याने सुनिता हारदे यांना सासू, भाचा व नणंदाने शिवीगाळ करुन दगड व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. 


सुनिता शिवनाथ हारदे, वय ३५ वर्षे, ह्या त्यांच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील तुळापुर येथे राहत असून शेजारीच त्यांची सासू जनाबाई व सासुरे वेनूनाथ हे राहवयास आहेत. दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास सुनंदा हारदे ह्या त्यांच्या घरी असताना आरोपी घरासमोर आले.


तेव्हा किरण औताडे हा म्हणाला कि, काल तु माझ्या आजीला काय म्हणाली होती? त्यावेळी सुनंदा हारदे म्हणाल्या कि, आज सकाळी आपल्या गावचे पोलीस पाटील बाळकृष्ण हारदे यांनी घरी घेवून भांडण मिटून गेले आहेत. तु आता भांडण वाढू नको. तेव्हा आरोपींनी सुनंदा हारदे यांना शिवीगाळ करुन दगड व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली.


सुनिता शिवनाथ हारदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी जनाबाई वेनूनाथ हारदे, रा. तुळापुर, ता. राहुरी, आणि किरण गोरक्ष औताडे, शोभा गोक्षनाथ औताडे, दोघे रा. माळेवाडी, ता. श्रीरामपुर, या तिघांवर गुन्हा रजि. नं. १८६/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.