Type Here to Get Search Results !

राहुरी - विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ

 विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ.



घर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपए आणावेत, यासाठी विवाहितेचा छळ, पाच जणांवर गुन्हा दाखल.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


घर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपए आणावेत, यासाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 


प्रीती मनीष सोनवणे, वय २४ वर्षे, रा. डोंबिवली, मानपाडा, जि. ठाणे, हल्ली रा. टाकळिमिया, ता. राहुरी, या तरुणीचा विवाह मनीष सोनवणे याच्याशी दि. १९ मे २०१९ रोजी झाला होता. लग्न झाले नंतर प्रीती सोनवणे ही तीच्या सासरी डोंबिवली येथे नांदणेसाठी गेली. 


मनिष सोनवणे याने प्रीती सोनवणे हिला सुरुवातीला व्यवस्थीत नांदवले. त्यानंतर आपल्याला डोंबिवली येथे घर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपए घेवुन यावे. यासाठी सासरच्या लोकांनी प्रीती सोनवणे हिचा शारीरिक व मानसिक छळ केला. 


सन २०२४ मध्ये मनिष याने पत्नी प्रीती हिला माहेरी आणुन सोडले व तुला १५ दिवसांनी घ्यायला येतो. म्हणुन निघुन गेले. त्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये त्याने प्रीती हिला सोडचिठ्ठी पाहिजे बाबतची नोटीस पाठवली. त्यानंतर प्रीती मनीष सोनवणे या विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 


त्या फिर्यादीवरून आरोपी पती- मनिष सुनिल सोनवणे, रा. डोंबिवली, जि. ठाणे, आत्यासासु- सविता अदिनाथ जाधव, रा. भोसरी, पुणे, आत्यासासु- मंदा भोळे, रा. बदलापुर, जि. ठाणे, तसेच ननंद- पुजा गणेश ढवळे व नंदाई- गणेश ढवळे, दोघे रा. डोंबिवली, जि. ठाणे, यांच्यावर गुन्हा रजि. नं. १३४/२०२६ भारतीय दंड संहिता कलम ३२३, ४९८ (अ), ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.