दोघा बाप लेकाला शिवीगाळ करुन दगडाने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
आरोपींनी शेतीचा सामाईक बांध उकरुन बांधावरील पोल उपटुन टाकले. तसेच दोघा बाप लेकाला शिवीगाळ करुन दगडाने मारहाण केल्याची घटना दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.
कृष्णा ठकसेन अनाप, वय २९ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील माळेवाडी डुकरेवाडी, इरीगेशन बंगला, सात्रळ येथे राहत आहे. आरोपी त्यांच्या शेजारीच राहत असून दोघांत राहुरी न्यायालयात शेतीचे वाद चालु आहेत.
दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास कृष्णा अनाप व त्यांचे वडील त्यांच्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथे सामाईक बांध उकरलेला दिसला व बांधावर रोवलेले सिमेंटचे पोल उपटुन कृष्णा अनाप यांच्या शेतात टाकलेले होते.
तेथे आरोपी आले होते. त्यावेळी कृष्णा अनाप यांचे वडील त्यांना म्हणाले की, तुम्ही बांधाची उकरलेली माती बांधाला लावुन द्या, उगाच वाद घालु नका. त्यावेळी आरोपींनी काहीच विचारपुस न करता कृष्णा अनाप यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण केली. तसेच हाताचे करंगळी जवळील बोटाला जोरात चावा घेतला. तसेच तुम्हाला सर्वाना जीवे सोडणार नाही, परत जर तुम्ही या शेतात दिसले तर तुमचे तंगडे तोडुन काढिन, अशी धमकी देवुन ते तेथुन निघुन गेले.
त्यानंतर कृष्णा ठकसेन अनाप यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी बापु गवजी अनाप, मच्छिंद्र बापु अनाप, चांगदेव गवजी अनाप, तिघे रा. सात्रळ, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. १४६/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११७ (२), ११८ (१), ३५१ (२), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
