Type Here to Get Search Results !

राहुरी - तु आमच्यात खेळायला कशाला येतो, असे म्हणत लोखंडी पाईप व लाथा बुक्क्याने मारहान.


 


क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण.


तु आमच्यात खेळायला कशाला येतो, असे म्हणत लोखंडी पाईप व लाथा बुक्क्याने मारहान.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


तु आमच्यात खेळायला कशाला येतो, असे म्हणत दोन तरुणांनी एका तरुणाला शिवीगाळ करुन लोखंडी पाईप व लाथा बुक्क्याने मारहान केली. ही घटना राहुरी काॅलेज जवळ दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. 


कृष्णा सुनिल चांदने, वय १७ वर्षे, रा. राहुरी कॉलेज जवळ, ता. राहुरी, हा दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.२० वाजे दरम्यान राहुरी कॉलेज येथे क्रिकेट खेळत असताना तेथे किरकोळ वाद झाले होते. तेव्हा आरोपी साई डौले याने कॉलेजचे ग्राउंडवर कृष्णा चांदणे याला लोखंडी पाईपने मारुन मला दुखापत केली होती. सदर मारहाण खेळामध्ये झाली व जखमी व आरोपी एकमेकांचे जवळ राहतात म्हणुन चांदणे याने तक्रार दिली नव्हती. 


त्यानंतर दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कृष्णा चांदणे हा राहुरी कॉलेज जवळ क्रिकेट खेळत असताना तेथे आरोपी साई डौले याने कृष्णा चांदणे याला गाडीवर बसवून सोहम डौले याचे दुकाना समोर घेऊन गेला. आणि म्हणाला की, तु आमच्यात खेळायला कशाला येतो. असे म्हणुन आरोपींनी कृष्णा चांदणे याला शिवीगाळ करुन लाथा बुक्क्याने मारहान केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.


कृष्णा सुनिल चांदने याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी साई डौले व सोहम दिपक डौले, दोघे रा. राहुरी काॅलेज रोड, राहुरी, या दोघांवर गुन्हा रजि. नं. १४८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.