बुवासिद्ध देव महाराज समाधी जवळ पून्हा एक घटना.
घटनेची चौकशी करुन तातडीने कारवाई करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी घडलेल्या एका घटने बाबत सकल हिंदू समाज, राहुरी यांनी प्रशासनाकडे निवेदन देत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, ६ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास शहरातील बुवासिद्ध देव महाराज यांच्या समाधी स्थळाच्या मागील बाजूस असलेले वस्त्र एका अल्पवयीन मुलाने पेटवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
त्याच दिवशी शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. अशा वेळी ही घटना शहरात पसरली असती तर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याची शक्यता होती. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित घडलेली एक वादग्रस्त घटना देखील रमजान महिन्यातच घडली होती. तसेच सध्याची ही घटना देखील रमजान महिन्यातच घडल्याने समाजात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप सापडले नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सकल हिंदू समाजाने प्रशासनाकडे केली आहे. तसेच मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित अल्पवयीन मुलासह त्या वेळी परिसरात उपस्थित असलेल्या सर्वांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.
ही घटना पुन्हा घडू नये आणि सामाजिक तणाव निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज, राहुरी यांच्या वतीने प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. हे निवेदन राहुरीचे तहसीलदार डॉ. अमित पवार तसेच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना देण्यात आले.
यावेळी सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
