Type Here to Get Search Results !

राहुरी - शिवांकुर विद्यालयात विद्यार्थी-पालकांसाठी समुपदेशन व्याख्यानाचे आयोजन


 


शिवांकुर विद्यालयात विद्यार्थी-पालकांसाठी समुपदेशन व्याख्यानाचे आयोजन

शिवांकुर विद्यालयात विद्यार्थी व पालक यांच्यासाठी डॉ चेतना बहुरूपी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ बहुरूपी यांनी आपल्या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती, मुलांचे मोबाईलकडील आकर्षण, पालकांचा विद्यार्थ्यांशी संवाद याविषयी पालकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने संस्थेचे सचिव डॉ प्रकाश पवार यांनी त्यांचा सन्मान केला.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार विश्वस्त डॉ गौरी पवार व मंगलताई पवार यांनी मार्गदर्शन केले.

  कार्यक्रमास शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, सौरभ भांबळ, प्रियंका पांढरे, ज्योती शेळके, शितल फाटक, सुजाता तारडे, सुनीता ढोकणे,  अनिता म्हसे, मोहिनी पेरणे, रोहिणी हापसे, सुरेखा मकासरे, सोनाली कुमावत, अनिता लांबे, दुर्गा बारवेकर,अकौटंट दिपाली उंडे व लिपिक भाग्यश्री झांबरे, शिपाई शारदा तमनर आदींसह बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.