Type Here to Get Search Results !

राहुरी - चेअरमन पदी रवींद्र पेरणे तर व्हाइस चेअरमन पदी धनंजय गिरी यांची बिनविरोध निवड

 चेअरमन पदी रवींद्र पेरणे तर व्हाइस चेअरमन पदी धनंजय गिरी यांची बिनविरोध निवड.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी येथील विद्या मंदिर प्रशाला सेवकांची सहकारी पतसंस्था (मर्यादित) यांच्या संचालक मंडळाची निवडणूक सन 2025–26 ते 2030–31 या कालावधीसाठी नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाच्या निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रवींद्र शंकर पेरणे यांची चेअरमन पदी तर धनंजय विनायक गिरी यांची व्हाइस चेअरमन पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.


या निवडणुकीत संचालक मंडळावर राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब छबू मोरे, बाबासाहेब किसन गुंजाळ, सतीश नारायण बोस्टे, गजानन भागवत बडाख, सतीश मुरलीधर गुलदगड, मनोज बाबासाहेब सुपेकर, रावसाहेब भास्कर आघाव, सौ. सविता राहुल जगताप तसेच नंदा सखाराम काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 


तसेच सचिव पदी राहुल श्रीरंग जगताप यांची निवड करण्यात आली. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती एस. डी. माने यांनी कामकाज पाहिले.


नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी बद्दल राहुरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव मनोजशेठ बिहाणी व सह सचिव अनुपशेठ बिहाणी, मुख्याध्यापक कैलास अनाप, उप मुख्याध्यापिका मंजिरी देशपांडे, कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नवीन संचालक मंडळाच्या माध्यमातून पतसंस्थेचा विकास अधिक वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.