विहिरीतून पाणि घ्यायचे नाही, असे म्हणुन आई व मुलाला काठीने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
विहिर माझ्या एकट्याची आहे, तूम्ही विहिरीतून पाणि घ्यायचे नाही, असे म्हणुन आरोपींनी आई व मुलाला काठीने मारहाण करुन दम दिला. ही घटना दि. १६ मार्च रोजी राहुरी तालुक्यातील तांदुळनेर शिवारात घडली.
राजेंद्र रघुनाथ घैर, वय ४४ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील तांदुळनेर येथे राहत आहे. त्यांची तेथे शेती असुन शेजारीच त्यांचा चुलत भाऊ संतोष घैर याची शेती आहे. दि. १६ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राजेंद्र घैर यांची आई घासाच्या शेताला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या.
तेथे आरोपी संतोष घैर हा आला व त्याने राजेंद्र घैर यांच्या आईला काठीने मारहाण करुन विहीर माझ्या एकट्याची आहे. विहीरीतुन पाणी घ्यायचे नाही. असे म्हणुन त्याने शेतात पाणी भरु दिले नाही. त्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास संतोष घैर व त्यांची आई दोघे शेतात पाणी भरण्यासाठी गेले.
तेथे आरोपी आले व म्हणाले कि, तुम्ही येथे पाणी भरायचे नाही, असे म्हणुन त्यांनी संतोष घैर व त्यांच्या आईला लाकडी काठीने मारहाण केली. तसेच तुम्ही येथे पाणी भरायचे नाही, असा दम दिला.
राजेंद्र रघुनाथ घैर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी संतोष गोरक्षनाथ घैर, सार्थक संतोष घैर, दोघे रा. कानडगाव, ता. राहुरी. व इतर दोन अनोळखी इसम असे एकूण ४ जणांवर गुन्हा रजि. नं. २३९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३ (५), ३५१ (२) प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
