Type Here to Get Search Results !

राहुरी - शिवांकुर विद्यालय जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

 शिवांकुर विद्यालय जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

शिवांकुर विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या महिला दिनानिमित्त विद्यालयात आरोग्य विषयी शिवांकुर फाउंडेशन च्या डॉ गौरी पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महिलांनी दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी डॉ गौरी पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच महिलांमध्ये कॅन्सर या आजाराबद्दल असणारी भीती दूर करण्यासाठी आणि योग्य उपचार वेळेवर होण्यासाठी महिलांना मार्गदर्शन केले.



भारताच्या लोकशाहीमध्ये तसेच संस्कारक्षम भारत घडविण्यामध्ये महिलांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन संस्थेचे सचिव डॉ प्रकाश पवार यांनी केले. प्रसंगी सर्व महिलांचा विद्यालयात गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला तसेच या महिलादिनानिमित्त विद्यालयात विविध मनोरंजन खेळ घेण्यात आले यामध्ये संगीत खुर्ची, पेपर रेस, तळ्यात मळ्यात या खेळांचा समावेश होता. सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दैनंदिन जीवनात स्वतःसाठी कधीही वेळ न देता सतत काम करत राहिल्याने आज आम्ही महिला एकत्रित आलो आणि इथे अनुभवलेला प्रत्येक क्षण हा खूप आनंददायी उत्साहवर्धक व प्रेरणादायी ठरला असे प्रतिपादन सहभागी झालेल्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, त्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले व असे महिलांसाठी उपक्रम नेहमी राबविले पाहिजेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

  विद्यालयाच्या वतीने खेळातील विजयी महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी हापसे तर आभार शितल फाटक यांनी केले.

 कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, विश्वस्त डॉ गौरी पवार व मंगलताई पवार यांनी मार्गदर्शन केले.

  कार्यक्रमास शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, सौरभ भांबळ, प्रियंका पांढरे, ज्योती शेळके, शितल फाटक, सुजाता तारडे, सुनीता ढोकणे,  अनिता म्हसे, मोहिनी पेरणे, रोहिणी हापसे, सुरेखा मकासरे, सोनाली कुमावत, अनिता लांबे, दुर्गा बारवेकर,अकौटंट दिपाली उंडे व लिपिक भाग्यश्री झांबरे, शिपाई शारदा तमनर आदींसह बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.