Type Here to Get Search Results !

नांदेड - श्री बालाजी नगर नामफलकाचे अनावरण उत्साहात



 


नांदेड - श्री बालाजी नगर नामफलकाचे अनावरण उत्साहात


प्रतिनिधि :मजहर शेख, नांदेड 


नांदेड, दि :24:-माहूर शहरातील माहूर–पुसद मार्गावरील वार्ड क्र. १३ मधील लोकवस्ती परिसरातील नागरिकांनी एकत्र येत आपल्या भागाचे नामकरण “श्री बालाजी नगर” असे करण्याचा निर्णय घेतला. या नव्या नामकरणाचा अधिकृत प्रारंभ म्हणून नगराच्या नामफलकाचे अनावरण दि. २२ एप्रिल रोजी उत्साहात पार पडले.


या नामफलकाचे अनावरण माहूर नगरीचे युवा नेतृत्व, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण होते. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


या प्रसंगी जेष्ठ नागरिक वसंतराव चव्हाण, भाजप नेते सुमितभाऊ राठोड, हिरासिंग चव्हाण, शंकर जयस्वाल, सियाराम जयस्वाल, सुरेश गिऱ्हे, रील स्टार प्रवीण जाधव, प्रदीप शेकूरवार, गोपाल चव्हाण, कुंदन तीवडकर,राहुल पाटील,संतोष जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी “श्री बालाजी नगर” या नावामुळे परिसराची ओळख अधिक दृढ होईल तसेच नागरिकांमध्ये एकात्मता वाढीस लागेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.