केशर मल्टीस्टेटला संजीवनी उद्योग समूहाचे बिपीनदादा कोल्हे यांच्या कडून कौतुकाची थाप.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
शैक्षणिक, सहकार, उद्योग तसेच साखर कारखानदारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत देशभरात ‘कोल्हे पॅटर्न’ची ओळख निर्माण करणारे संजीवनी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बिपीनदादा शंकरराव कोल्हे यांनी नुकतीच केशर उद्योग समूहाला सदिच्छा भेट दिली.
स्वर्गीय माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या संजीवनी उद्योग समूहाच्या कार्याचा वारसा पुढे नेत असलेल्या बिपीनदादा कोल्हे यांनी जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या केशर उद्योग समूह तसेच केशर मल्टीस्टेटच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
यावेळी केशर मल्टीस्टेटचे चेअरमन तथा युवा नगरसेवक सागरदादा तनपुरे यांनी बिपीनदादा कोल्हे यांचा सत्कार केला. केशर उद्योग समूह व केशर मल्टीस्टेटच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सामाजिक, आर्थिक व विकासाभिमुख उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त करत बिपीनदादा कोल्हे यांनी संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बाळासाहेब गाडे, ॲड. जालिंदर ताकटे, सचिन वराळे, गणेश गाडे, सुजय काळे, गोरखनाथ घोरपडे, एकनाथ बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
