Type Here to Get Search Results !

पारनेर - शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन- सिताराम खिलारी | ढोकेश्वर विद्यालयात पुस्तके, गुलाबपुष्प वाटप करत नवोगत विद्यार्थ्यांचे स्वागत

 शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन-   सिताराम खिलारी

  ढोकेश्वर विद्यालयात पुस्तके, गुलाबपुष्प वाटप करत नवोगत विद्यार्थ्यांचे स्वागत.



     शिक्षण व्यवस्था ही सामाजिक व्यवस्था आहे. ती कोणाच्याही मालकीची नाही. समाजाचा जितका सहभाग वाढेल तितकी समाजाला ही शिक्षण व्यवस्था आपली वाटू लागेल. शाळेत विद्यार्थ्यांच्या वर्तनात परिवर्तन होत असते म्हणून शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे असे प्रतिपादन  जिल्हा मराठा संस्थेचे विश्वस्त सन्मा. सिताराम खिलारी पाटील यांनी केले. 

       पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्री ढोकेश्वर विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ कार्यक्रम प्रसंगी सिताराम खिलारी उर्फ आण्णा बोलत होते.

  या प्रसंगी इयत्ता 5 वी ला तसेच इतर वर्गात नव्याने आलेल्या विदयार्थ्यांचे गुलाबपुष्प, मोफत पुस्तके आणि बिस्कीट वाटप करून उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या आवारात पद्माभूषण आण्णासाहेब हजारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी वि. का सेवा सोसायटीचे  चेअरमन नारायण झावरे साहेब माजी चेअरमन बबनराव पायमोडे, ग्रामपंचायत सदस्य दत्ताशेठ निवडुंगे, बापूसाहेब रांधवन, प्राचार्य बाळासाहेब खिलारी, पर्यवेक्षक बाळासाहेब निवडुंगे, समन्वयक अशोक गांगड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लहू जाधव, उपाध्यक्ष शिवराज भालके, कैलास नर्हे, अर्जुन ठाणगे, राजू पठाण, शेखर गायकवाड, सुनील पायमोडे, संभाजी मेहेर, सुनील ठुबे, अर्जुन रोकडे, जगन्नाथ रोकडे, सुभाष वाळुंज, अमोल शिंदे, नितीन खोडदे, अर्जुन वाळुंज, कविता शिंदे, रेखा अडसूळ, सोनाली रोकडे, वर्षा मेहेर, अरिफा शेख, सुवर्णा दुधावडे मनीषा भोजने कल्याणी नऱ्हे, भाग्यश्री खोडदे, यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवींद्र मते, बाबासाहेब जाधव, अतुल सैद, भाऊसाहेब हिंगडे, राजेंद्र ढोणे, पोपट जगदाळे , अशोक वाघ, आतिष झावरे,  संदीप खिलारी, नारायण शेळके, निलेश जासूद,  नितीन ढोकळे, श्रीरंग धामणे, संदीप महाडूळे, विष्णू भद्रे, निलम खिलारी,  वैशाली गायके, सोनल रोहोकले, सुरेखा ठाणगे, कल्पना जाधव, सुमन वाळुंज , प्रिया डवणे, वर्षा भोंडवे,  पवन कुटे अनुष्का कांबळे इत्यादी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल रोहकले यांनी केले तर आभार रविंद्र मते यांनी मानले