Type Here to Get Search Results !

राहुरी - रावसाहेब पवार यांना दिल्ली येथे ऑनररी डॉक्टरेट प्रदान

 रावसाहेब पवार यांना दिल्ली येथे ऑनररी डॉक्टरेट प्रदान:-



ग्रामीण भागाची नाळ व समज असल्याने शिव प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष असलेल्या रावसाहेब पवार यांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी सर्वत्र इंग्रजी माध्यमाचा बोलबाला असताना देखील मराठी माध्यमाची व त्याला सेमी इंग्रजीची जोड असणारी शिवांकुर विद्यालय कोंढवड, शिवांकुर रेनबो स्कूल राहुरी, शिवांकुर विस्डम स्कूल खडांबे ह्या अतिशय दर्जेदार, शिस्तप्रिय शाळा सुरू करून ग्रामीण भागातील मुलांसाठी संधी उपलब्ध करून दिली.

संस्थेच्या माध्यमातून नियमित वृक्षारोपण, सामाजिक कार्य, रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी समुपदेशन वर्गाचे आयोजन तसेच शिवांकुर पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचा विश्वास संपादन करून नवीन व्यावसायिकांसाठी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली.

शिव प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष  रावसाहेब नामदेव पवार यांनी सन 2013 सालापासून सुरू केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन FRANKFORD INTERNATIONAL UNIVERSITY United States या संस्थेच्यावतीने Philanthropy या क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत ऑनररी डॉक्टरेट ही पदवी दिनांक 6 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या पदवीग्रहण समारंभात युनिव्हर्सिटीच्या अधिकृत व देशभरातून उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान केली.

रावसाहेब पवार यांना मिळालेल्या ऑनररी डॉक्टरेट बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.