Type Here to Get Search Results !

पारनेर - मातोश्री मीराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये पर्यावरण दिन साजरा

 मातोश्री मीराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये  पर्यावरण दिन साजरा 



टाकळी ढोकेश्वर 


मीराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जुले हर्या , ता. पारनेर येथे पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.  वृक्षारोपण, औषधी वनस्पती आणि जलसंवर्धन, जनजागृती,ई कचरा व्यवस्थापन,प्लास्टिक मुक्त भारत,असे काही अभियान राबविण्यात आले.  महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर  यांनी पर्यावरण संरक्षण आणि औषधी वनस्पती यांचे संवर्धन याबाबत माहिती दिली तसेच पर्यावरण संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून त्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न करावेत असे आवाहन दीपक आहेर यांनीकेले 

  या वेळी मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान चे सचिव किरण आहेर संचालिका डॉक्टर श्वेतांबरी आहेर, संचालिका शितल आहेर खजिनदार बाळासाहेब उंडे प्रा सौरभ गायकवाड  प्रा प्रथमेश धुमाळ, प्रा योगेश मुसळे, प्रा विद्या पवार प्रा ज्योती शिंदे, कार्यालय अधीक्षक अजिंक्य गागरे उपस्थित होते 

 प्राध्यापक राहुल कुमार राहणे यांनी प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन केले  डॉ वैभव कदम यांनी नैसर्गिक संसाधन व आधुनिक शेती याची माहिती दिली नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.तिवारी यांनी केले 

 

  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुलकुमार राहणे यांनी प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन केले विभाग प्रमुख डॉ. वैभव कदम यांनी नैसर्गिक संसाधन तसेच आधुनिक शेती याच्याबद्दल माहिती प्रदान केली.  नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक तिवारी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रतिज्ञा आणि पर्यावरण निर्मिती साठी योगदान देण्याची प्रतिज्ञा आणि पर्यावरण निर्मिती साठी योगदान देण्याची  विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रतिज्ञा घेतली